अमरावती, दि. 12 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अधिक्षक निलेश खटके यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.