धामणगाव रेल्वे,
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना महायुती सरकारने घोषित केले होते, त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध होताच या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील यवतमाळ जिल्ह्यातील 742 तीर्थ करू + 58 सहाय्यक असे एकूण 800 तिर्थकरुंनी धामणगाव रेल्वे स्थानक वरून श्रीराम मंदिर अयोध्येला दर्शनासाठी रजिष्टर केले होते यापैकी 700 यात्रेकरुंनीं प्रस्थान केले
धामणगाव चे रेल्वे स्टेशनवर जय श्रीरामाच्या गगनभेदी घोषणा व सर्वत्र भगवामय वातावरणाने धामणगाव स्टेशन जणू अयोध्या नगरी भासत होते जाणाऱ्यांमध्ये यवतमाळ व कळंब तालुक्यातील प्रत्येकी १०८ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नेर तालुका ५८, दारव्हा ९, बाभूळगाव ४१, दिग्रस ८६, पुसद ४०, उमरखेड ९३, महागाव ५७, आर्णी २५, घाटंजी ११३, राळेगाव ५१, पांढरकवडा १५, वणी २ यापैकी 700 ज्येष्ठांचा या यात्रेत समावेश आहे ज्येष्ठ भक्तांसोबत सोबत सहकार्य म्हणून ५८ सहाय्यक सुद्धा रवाना झाले आहेत अयोध्येला जाणारे ज्येष्ठ बुधवारी सकाळ पासूनच धामणगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते
पहिल्या टप्प्यातील धामणगाव शहरातून शुभारंभ होत असून अयोध्या हे पहिले तीर्थक्षेत्र म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर योजनेत भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्रींना निशुल्क पाणी चहा जेवण व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत आहे. देशातील मोठ्या तीर्थस्थळांना एकदातरी भेट देण्याचे ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. आर्थिक स्थिती नसल्याने किवा सोबत कोणी नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांना यात्रांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत करण्यात आली आहे याप्रसंगी धामणगाव रेल्वे स्टेशन वर लॉयन्स क्लब (इलीट) ने बिस्कीट वितरण केले .
…………………………………….
भारत गौरव नावाने अयोध्येकरिता प्रस्थान केलेल्या गाडीला यात्रा व्यवस्था प्रमुख व यवतमाळ जिल्ह्याच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला वामनराव मून यांनी हिरवी झेंडी दाखवली याप्रसंगी सल्लागार समिती सदस्य कमल छांगाणी, अर्चना राऊत स्टेशन प्रबंधक मुदलियार आर पी एफ च्या पोलीस निरीक्षक यशोदा यादव उपनिरीक्षक एच.एल.मिना, गजानन जाधव, राजेश औतकर,दत्तापूर ठाणेदार गिरीश ताथोड कमर्शियल इन्स्पेक्टर दीपक साहू, लॉयन्स चे चेतन कोठारी,विलास बुटले व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते ट्रेनचे सारथी आनंद यादव हजारीलाल आणि करीम यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले धामणगाव च्या स्टेशनवरून गाडी एक वाजून 43 मिनिटांनी प्रस्थान झाली ट्रेनला पाच एसी तसेच सात स्लीपर कोच असून व्यवस्थे करिता 2 डब्बे अतिरिक्त लावण्यात आले आहेत अशा एकूण या ट्रेनला 14 डबे आहेत बुधवारी निघालेली सदर गाडी 16 मार्चला परतीच्या मार्गावर राहील
………………………………………….