धामणगाव रेल्वे : सर्वोदय गणेश मंडळाचा भव्य मिरवणूक व विसर्जन सोहळा संपन्न

0
114
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे येथील सर्वोदय गणेश मंडळ, हनुमान मंदिर (एलआयसी ऑफिस मागे) यांच्या वतीने आयोजित गणपती बाप्पाच्या भव्य मिरवणुकीचा व विसर्जन सोहळा अतिशय उत्साहात, दिमाखदार वातावरणात व भक्तिभावाने संपन्न झाला.

“गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात, ढोल-ताशांच्या दणदणाटात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. आकर्षक सजावट, भक्तिगीते, गाणी, वादन-पथक तसेच रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीचे वातावरण अधिकच देखणे झाले होते.

मंडळाचे कार्यकर्ते व मान्यवर मंगेश भाऊ देशमुख, प्रफुल साबळे, राजेश सरफे, शशांक गडबेल, आशिष भाऊ केने, मुरली भाऊ कडु, अजय भाऊ किरटकर, विशाल भाऊ सुटे, मनोज भाऊ ठाकरे, पिंटू भाऊ चौधरी, अशोक भाऊ शर्मा, डॉ. अपतुरकर, राजू भाऊ गुल्हाने, रितेश भाऊ देशमुख, अतुल भाऊ भोगे, ऋषिकेश घोरडे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

या सोहळ्यामुळे संपूर्ण धामणगाव रेल्वे शहर भक्तिमय व उत्सवमय वातावरणाने दुमदुमून गेले होते.

veer nayak

Google Ad