जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जळका (पटाचे)येथील विधार्थी संक्या 49 अजून तेथे एकच शिक्षक असल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच पराग राऊत पाटील तसेच शाळा सुधार समितीने वारंवार गटशिक्षणाधिकारी अधिकारी सपना भुगावकर यांना अजून एक शिक्षक नियुक्ती करण्याची विनंती केली. यावर्षी शाळा सुरु झाली तेव्हा पासून केली त्यांनी वारंवार टोलवा टोलवी चे उत्तरे देऊन आपल्या आकार्यक्षम पणाचे उदाहरणं दिले पर्यायानी सरपंच यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी सदर प्रकरणी तक्रार केल्या नंतर सुद्धा हाच प्रकार सुरु राहिला त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सतीश मुघल यांना सुद्धा सरपंच यांनी तक्रार केली तरी सुद्धा संबंधित विभागाणे या विषयावर हा पूर्ण संत गतीने विचार करत आहे. या अशा ढसार कारभारामुळे खेडो पाडी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या अंतिम स्वास घेत आहे अशे असताना सुद्धा जळका पटाचे येथे चांगला विध्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असताना सुद्धा इथे जाणीवपूर्वक शिक्षक दिले नाही त्याचा इथे होणाऱ्या ऍडमिशन वर व शिक्षणावर त्याचा परिणाम झाला, कारण या वर्षी गावातील पुष्कळ पालकांनि आपल्या गावतीलच शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळे मध्ये ऍडमिशन घेण्या कडे पालकांचा ओढा असताना नेमका ऍडमिशन टाइम वर एकच शिक्षक असल्या कारणांनी कमी झाला सगळ्या गोष्टीला तालुका गटशिक्षणाधिकारीच (पंचायत समिती धामणगाव रेल्वे) जीमेदार आहे असा आरोप सरपंच यांनी केला. कारण तालुक्यातील पुष्कळ ठिकाणी जास्तीचे शिक्षक असताना सुद्धा त्यांच्या सोईचा विचार करून संबंधित अधिकारी त्यांना तिथेच त्याच शाळेवर ठेवत आहे यात संबंधित अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तसा तक्रार अर्जंच गावाचे सरपंच यांनी केलेला आहे पुष्कळ गावातील शाळेत 30ते 40 विध्यार्थांवर 3 ते 4 शिक्षक आहे आणि जळका (पटाचे )येथे 49 विद्यार्थी असून सुद्धा फक्त एकच शिक्षक असल्या मुळे पंचायत समिती आमच्या शाळेला का सावत्र वागणूक देत आहे असा सवाल सरपंच यांनी केला आहे.
तसेच पूर्ण चौकशी केली असता पुष्कळ मोठया अनियमित्तेचा प्रकार संबंधित गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर यांच्या मार्फत झाल्याचे निदर्शनात येत आहे प्रकरणी ज्यांची ज्यांची जीमेदारी असेल व ज्यांनी प्रकरणी चुकीचे निर्णय घेतले असेल किंवा प्रशासनाची दिशाभूल केली असेल त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याच्या विरोधात कठोर कार्यवाही करावी, तसेच जळका (पटाचे )येतील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला अर्जेन्ट शिक्षण विभागाने मार्गदर्शित केलेल्या रेशो नुसार 24 तासाच्या आत शिक्षक देण्याची माफक मागणी सरपंच पराग राऊत यांनी केल्याचे सांगितले तसेच समाजाचा मुख कणा असणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे तसेच सुरु असणाऱ्या अशा भोंगळ कारभाराकडे राजकीय लोकांनी लक्ष टाकण्याचे आव्हान केले.