धामणगाव आरपीएफने राबविले जनजागृती अभियान. उपनिरीक्षक मीना यांचे सर्वत्र अभिनंदन

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

जनावर लहान मुलं रेल्वे रुळावर येऊ नये खेळताना मुलांनी रुळावर दगड गोटे ठेवू नयेत तसेच रेल्वे रुळावर परिसरात असलेल्या कुटुंबांनी रेल्वेला अनावधानाने नुकसान होईल असे कोणतेच कार्य करू नयेत करिता धामणगाव रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक लाल मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती अभियान राबविले आहे 

उपनिरीक्षक लाल मीना यांनी कर्मचाऱ्यांसह रेल्वे लाईन जवळील गावांमध्ये  जनावर फिरू नयेत याकरिता तपासणी सुद्धा केली .रेल्वे रुळावर चरणे, रेल्वे रुळाजवळ कोणताही खेळ खेळणे आणि पतंग उडवणे, रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, रेल्वे रुळावर दगड टाकणे इ. असे करणे कायदेशीर गुन्हा असल्याचे मीना यांनी घरोघरी जाऊन सांगितले धामणगाव परिसरातील रेल्वे रुळा जवळ असलेल्या सर्व घरापर्यंत जाऊन मीना यांनी उपरोक्त उल्लेखनीय असे अभियान राबविले आहे गावकऱ्यांना समजावून सांगून वरील संदर्भात रेल्वे स्टेशन व परिसरात जनजागृती मोहीम विविध ठिकाणी राबविण्यात आली या उल्लेखनीय कार्यकरिता उपनिरीक्षक लाल मीना यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे रेल्वे. सल्लागार समितीने सुद्धा उपनिरीक्षक मीना  व अभियानात सहभागी सर्व आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे

veer nayak

Google Ad