या योजनेची अंमलबजावणीचे स्वरूप व्यापक आहे. राज्यातील हजारो बेरोजगार युवक व युवतीच्या हाताला खरे काम मिळाले. त्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे.
परंतु हा प्रशिक्षण कालावधी केवळ सहा महिन्याचा असून त्यानंतर प्रशिक्षणार्थी यांनी काय करावे ? तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा बेरोजगार होऊ हा प्रश्न प्रशिक्षणार्थी यांना पडला आहे .
प्रशिक्षणार्थी यांनी शासनाला मागणी केली की आमचा प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यावरून ११ महिने करून देण्यात यावा जेणे करून आम्ही आमच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून आमच्या कुटुंबाला मदत होईल. त्यानंतर आम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कंत्राटी स्वरूपात शासनस्तरावर सामावून घेण्यात यावे आणि विद्यावेतन वेळेवर देण्यात यावे करिता मा.तहसीलदार साहेब / मा. जिल्हाधिकारी साहेब / मा. सहा. आयुक्त , कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,अमरावती यांना निवेदन देण्यात आले