धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात 1342 वाढले नव मतदार

0
126
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

लोकसभा निवडणुकीचे बिगुल आणि आचार संहिता लागली असून अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपला जोर लावायला सुरुवात केली आहे.
त्यातच धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र वर्धा लोकसभा क्षेत्रात येत असल्यामुळे या ठिकाणी प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांची शक्ती पणाला लागणार आहे.
धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये तीन तालुक्याचा समावेश असून यावेळी 1342 नवीन मतदार आपले नव्याने हक्क बजावतील.
वर्धा लोकसभा क्षेत्रातील 36धामणगाव रेल्वे मतदार संघातील तीन तालुक्याचा समावेश असून त्यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, येतात. 36 धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रामध्ये तीन 305916 इतके मतदार असून त्यामध्ये चांदुर रेल्वे 84 255 इतके तर पुरुष 42895 स्त्रिया 41449 आहेत. धामणगाव रेल्वे 110523 आहेत तर पुरुष 56225 आहेत तर स्त्रिया 54297आहेत तर नांदगाव खंडेश्वर 111138 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 56776 तर स्त्रीया 54362 आहेत.
वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये धामणगाव विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच नव मतदानाचा हक्क1342 बजावतील.
2 नवीन तृतीयपंथी सुद्धा आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावतील. विधानसभा क्षेत्रामध्ये
1752 अपंग मतदार असून, 4799 सीनियर सिटीजन मतदार आहेत.
युथ मतदार म्हणून 3275 आहेत.
वर्धा लोकसभा धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळी मतदार कोणाला कल देणार या कडे लक्ष लागले आहे.
भाजपाकडून रामदास तडस यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनी आपले प्रचाराला सुरुवात पण केली.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा अजूनही उमेदवार निश्चित नसल्यामुळे या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
नवीन मतदार कुणाला मत देणार विकासाच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या समस्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देणार याकडे लक्ष लागले आहे

veer nayak

Google Ad