धामणगाव एज्युकेशन संस्थेद्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात दिनांक 05/07/2025 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता भव्यदिंडीचे आयोजन करण्यात आले

0
39
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,वारकऱ्यांचे श्रद्धास्थान, संत शिरोमणी “विठू माऊली”! आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा पंढरपुरात जमला व हजारो दिंड्या पताक्यांच्यां गजरात पंढरीच्या पांडुरंगाचे लाखो भक्तांनी “याची देही याची डोळा” दर्शन घेतले व कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळवले. याचेच औचित्य साधून धामणगाव एज्युकेशन संस्थेद्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात दिनांक 05/07/2025 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता भव्यदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थिनींनी विठू माऊलीच्या नामघोषात गजर व पावली टाळ घेत, रिंगण घालत, भजनाने धामणगाव नगरीत एक चैतन्यच भरून टाकले. प्रथम विठ्ठलाच्या पालखीचे शाळा समितीच्या अध्यक्षा आदरणीय सौ शोभा देवी राठी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.देशपांडे मॅडम व यांच्या हस्ते विठ्ठल व रुखुमाई यांचे तुळशीपत्र ,पुष्पहार घालून पूजन केले गेले. शाळेतून पालखी दिंडीला सुरुवात झाली. प्रभात विभागातील विठ्ठलाच्या वेशभूषेत कु. तुळशी हरीश पुरोहित तर रुक्मिणीच्या वेशभूषेत कु. स्वरा अमोल काळमेघ (वर्ग 5 पांझरा) तर माध्यमिक विभागातील विठ्ठलाच्या वेशभूषेत कु. प्रयोगी गोडबोले(वर्ग 10 नंदिनी) व लक्ष्मी धांदे (8 अलकनंदा) तर विधी चौधरी 10 (नंदिनी)व भूमिका साळवीकर (10 पयोष्णी) या विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशभूषेत होत्या . तर इतर विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तुळशी वृंदावन घेऊन दिंड्या पताका घेऊन सहभागी झाल्या होत्या.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी दिंडीत सहभागी झाले. प्रथम शास्त्री चौकातील गजानन महाराज मंदिरात पूजन करण्यात आले. “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षदिंडीची सुरुवात करण्यात आली. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . देशपांडे व उपमुख्याध्यापक श्री.राठोड तसेच इको क्लबचे प्रमुख श्री वडगिरे यांच्या हस्ते नागरिकांना वृक्षाची रोपटे भेट म्हणून देण्यात आली.

दिंडी धवणेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पोहोचली.तेथे शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ.देशपांडे , तसेच इतर शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीचे पूजन करून, रिंगण घालून टाळ, लेझीम ने पावली घेत, दिंडी वाजत गाजत भजन म्हणत टाळ मृदुंगाच्या गजराने शाळेच्या आवारात पोहोचली. त्यानंतर विद्यार्थिनींनी टाळ,लेझीम चे रिंगण घालून परत विठुरायाच्या नामाचा गजर करत भक्तीचा आनंद घेतला.व त्यानंतर वर्ग 9 व 10च्या विद्यार्थिनींनी समूह भजन गायन केले. या दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशपांडे , उपमुख्याध्यापक श्री राठोड , पर्यवेक्षिका कु. टेंभुर्णे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर बंधू यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ देशपांडे यांनी सुद्धा चिमुकल्या वारकऱ्यासोबत विठ्ठलाचा जयघोष केला…

veer nayak

Google Ad