जळका (जगताप) येथे गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सागर ठाकरे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे 

     श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त चांदुर रेल्वे येथील जळका (जगताप) येथे भोपे परिवाराच्या वतीने आयोजित गायक सागर ठाकरे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात “गण गण गणात बोते”, “पुण्य घ्या पुण्य घ्या पदरात” यांसह विविध भक्तिगीते सादर करण्यात आली. मुख्य गायक सागर ठाकरे यांच्यासह सहगायक सचिन घरफळकर, सतीश राऊत, प्रफुल्ल महाले व प्रज्वल गुल्हाने यांनी अभंग, आरती व नामस्मरण सादर करून उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब केले. वाद्यसंगतीत बासरीवादक प्रमोद भेंडे, तबलावादक मंगेश वानखडे तसेच ऑक्टोपॅडवर सुनील वानखडे यांनी सुरेल साथ दिली.

टाळ-मृदंगाच्या नादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सुरज भोपे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. या भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भोपे परिवाराचे उपस्थित भाविकांनी मनःपूर्वक कौतुक केले.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad