यामध्ये मातीच्या बैलजोळ्याची आकर्षक सजावट व उत्कृष्ट पारंपारिक वेशभूषा या आधारावर स्पर्धा घेऊन लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सूतगिरणी प्रभागाचे माजी नगरसेवक डॉक्टर राजेंद्रजी तायडे व संस्कार वाचनालयाचे अध्यक्ष मोतीलालजी गवई होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री घनश्यामजी गबने व राजेंद्र राऊत सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रंजनाताई काळमेघ प्रास्ताविक सौ.शितलताई लांजेवार स्पर्धेचे निरीक्षक सौ. कांचनताई ठाकरे, सौ.रंजनाताई गवई श्री दादारावजी टोपले व श्री माणिकराव पकडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे श्री लक्ष्मणराव ढवळे,श्री प्रल्हादराव लांजेवार, श्री उद्धवराव वाकोडे,श्री सुरेंद्र मोहोळ, श्री समर्थ साहेब तसेच वाचनालयाचे सदस्य सौ. दीपिका ढवळे,मंजू चिखलकर, वर्षा जाधव, सीमा डोळे,भारती गुहे, जया माहोरे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमात जेष्ठ नागरिक मंडळाचे सभासद वाचनालयाचे सदस्य व परिसरातील नागरिक व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या