प्रतिनिधी
आर्थिक वर्ष २०२४ मधील दर्यापूर शहर १ वीज वितरण केंद्र अंतर्गत वीज ग्राहकाकडील वीज बिल थकबाकी वसूली करिता सर्व कर्मचाऱ्यानी अविरत प्रयत्न केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित दर्यापूर शहर १ वीज केंद्राच्या वतीने श्री सारंग शेषराव गजभीये . सहाय्यक अभियांत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित दर्यापूर, शहर १ यांच्या कडून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशस्ती पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्र संचलन अतुल धर्माळे यांनी करत कार्यक्रमाचे अध्यक्ष सारंग शेषराव गजभीये सहाय्यक अभियांत व प्रमुख सुनील लिंगोट असून कार्यक्रमा करिता कर्मचारी सुनील ढेंगळे , प्रवीण शेलेकर, नेमाडे विवेक बोडे , राजुभाऊ सोळके , कुणाल देशमुख , कु पूनम राईबोले , राहुल विजेकर , अविनाश पवार , संकेत लोदे ,कुणाल पोटे ,नीरज पोटे उपस्तीत होते वरिष्ठांनी केलेल्या गुणगौरव मुळे समस्त कर्मचाऱ्यात नवंऊर्जा निर्माण झाली असून अधिक जोमाने काम करण्याचे कर्मचारी यांनी आश्वासन दिले