धामणगांव रेल्वे,
वैदर्भीय आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत गजानन महाराजांचे कोठारी नगर स्थित भव्य वास्तुत दि. ०२ जुन १९९६ ला आगमन झाले. अल्पावधीतच महाराजांचे हे देवस्थान परिसरातील असंख्य भक्तगणांचे श्रध्दास्थान बनले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रींचा प्रगट दिन उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे प्रगट दिन उत्सव निमित्य
दि. १२/२/२०२५ ते दि. १८/२/२०२५: दररोज दु. ३ वा. ह.भ.प. श्री. नाना महाराज जेधे-देशमुख (श्रीक्षेत्र बाई)
यांचे संगीतमय श्रीराम कथा प्रबोधन
दि. १८/२/२०२५ मंगळवार
रात्रौ ८ वा. श्री सिध्दीविनायक गुरूदेव भजनी मंडळ, द्या.रे. यांचे भजन दि. १९/२/२०२५ बुधवार
दु. २ वा. “श्रीं” च्या पालखीची नगर परिक्रमा रात्री ८ वा. ह.भ.प. श्री. नाना महाराज जेथे देशमुख यांचे (शिवचरित्र) हरिकिर्तन सकाळी ७ वा. “श्री” चा महाअभिषेक दि. २०/२/२०२५ गुरूवार
स. १० वा. ह.भ.प.श्री. नाना महाराज जेधे-देशमुख यांचे काल्याचे किर्तन
दु. १२.३० वा. पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे उत्सवा दरम्यान दररोज सकाळी ५ वा. काकडा आणि सायं. ६ वा. हरिपाठ होणार आहे तसेच
दि. १६ फेब्रु. २०२५ ते दि. २० फेब्रु. २०२५ दररोज स. ७ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण होईल.”श्री” सेवेचा आणि “श्री” कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट कोठारी नगर तर्फे करण्यात आले आहे
——————————————
चांडक आणि बेलवणकर कडे सुद्धा उत्सव….
श्री गजानन माऊली प्रकट दिनानिमित्त अमर शहिद भगतसिंग चौक येथील निवासीत बद्रीनारायण चांडक व शास्त्री चौक येथील पाण्याच्या टाकी जवळील अनिल बेलवनकर यांच्या निवासस्थानी सुद्धा दरवर्षी श्रींचा प्रगट उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या ठिकाणी सुद्धा २० फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे हे येथे उल्लेखनीय