गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दुर्गा उत्सव मंडळ तर्फे यंदा भव्यदिव्य पद्धतीने घटस्थापना व दुर्गामूर्ती स्थापना सोहळा पार पडला. सकाळपासूनच गावात मंगलध्वनी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. देवीची आरती, मंत्रोच्चार व ढोल-ताशांच्या गजरात हा पवित्र सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या मंडळाचे अध्यक्ष गजानन ठाकरे महाराज, उपाध्यक्ष सुनील भेंडे, सचिव अमोल साहरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मंडळाचे सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये
विलासभाऊ उचके, तुषार कोकाटे, अविनाश अंबाडारे, चेतन बुगल, संदीप ठाकरे, अविनाश ठाकरे, सतीश बुगल, सचिन कुरमकार, दिवाकर भेंडे, प्रमोद राऊत, सतीश जाधव, संतोष आमडारे, संतोष ठाकरे, सुवास ठोसर, जगनराव भुसारी, स्वप्निल इंगळे, मनीष ठाकरे, साहिल जूनघरे, मयूर जूनघरे, मयूर बुगल, नरेश डबळे, मनीष ठाकरे, उमेश रामेकर आदींचा विशेष सहभाग लाभला.
सर्व मित्र मंडळ, दाभाडा चे तरुण कार्यकर्तेही मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
गावात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण असून, पुढील दिवसांत मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन मंडळे, दिंडी सोहळे व समाजजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण दाभाडा गावात उत्साहाचे व श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“घटस्थापना सोहळ्यावेळी भाविकांचा मोठा सहभाग”















