सायकलिंग स्पर्धेत पीएमश्री गांधी विद्यालयाची कु. वैष्णवी राऊत प्रथम

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : मुलींमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक गांधी विद्यालयास प्राप्त

सामाजिक वनीकरण विभाग वर्धा परिक्षेत्र आर्वी तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत दिनांक 4 ऑक्टोबर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा अमरावती रोड येथील शीतला माता मंदिर ते पॉलिटेक्निक कॉलेज आर्वी आणि परत अशी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एनसीसी छात्र सैनिक असलेले कु. वैष्णवी राजेंद्र राऊत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

तसेच कु. रिया आशिष चव्हाण यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि खुशी नरेंद्र राव भिडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला यांना वनविभाग आर्वी च्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 501 ,301 आणि 201 रुपये रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच मुलांमधून रौनक अमोल इंगोले हा सहाव्या स्थानी आला या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन इको क्लबचे श्री नावेद गनी सर प्राचार्य श्री विश्वेश्वर पायले पर्यवेक्षिका कु. ज्योती अजमिरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

veer nayak

Google Ad