गौरक्षण संस्थेत आज भूमिपूजन सोहळा.. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित राहणार..

0
126
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

धामणगाव नगरीतील प्राचीन असलेल्या निव्वळ गौ सेवेच्या उद्देशाने त्याग आणि समर्पणातून उभारण्यात आलेल्या गौरक्षण संस्थेमध्ये आज शनिवारी गोवंश शेड व चारा गोदाम बांधकामाचे भूमिपूजन  महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या शुभ हस्ते तर आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विशेष उपस्थित राहणारे खासदार अमर काळे गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी प्रसिद्ध समाजसेवक राधेश्याम मुंदडा  पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे सह आयुक्त डॉ. पूनम नागपुरे यांच्या हस्ते  होणार आहे सकाळी  १० वाजता गौरक्षण संस्थेच्या आवारात होणाऱ्या गोवंश शेड करिता महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश योजना निधीमधून धामणगावच्या गौरक्षण संस्थेला २५ लक्ष रुपये मंजूर झालेले आहे तसेच अतिराज (मुंदडा) परिवार तर्फे ४ लाख रुपये देणगी प्राप्त झाली असून या निधीमधून गोवंश शेड व चारा गोदाम बांधकामाचे भूमिपूजन उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे

या कार्यक्रमाला धामणगाव नगरीतील गोवंश प्रेमींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी उपाध्यक्ष गिरीश मुंदडा सचिव संजय राठी यांनी केले आहे

veer nayak

Google Ad