दीक्षांत समारंभ एस ओ एस कब्स, धामणगाव रेल्वे येथे “लहान पावलांनी सुरू झालेला हा शिक्षणाचा प्रवास उद्या मोठ्या यशाच्या दिशेने नेणारा ठरेल.

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

या उक्ती सह” के.जी.-२ च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत ( Graduation day ) समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

दिनांक:-२८/०३/२०२६

एस ओ एस कब्समध्ये दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश लहान विद्यार्थ्यांनी प्री-प्रायमरी शिक्षणाची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल त्यांचा गौरव करणे आणि पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिराबाई गोयंका कन्या विद्यालययाच्या मुख्याध्यापिका माननीय सुनिता देशपांडे मॅडम उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या प्राचार्या मा.प्रचीती धर्माधिकारी व प्री-प्रायमरी हेड मा.शबाना खान तसेच मा.उपप्राचार्य तुषार रेवतकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात के.जी.-२ च्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक व आनंददायी प्रवेशाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले.

यानंतर प्री प्रायमरी हेड मा.शबाना खान यांनी स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शपथ घेत शिक्षणात प्रामाणिकपणा, शिस्त आणि चांगले संस्कार जपण्याचा संकल्प केला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या भाषणातून शाळेतील अनुभव आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्राचार्या मा.प्रचीती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.सुनीता देशपांडे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

त्यानंतर केजी-2 च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मा.प्राचार्या प्राचीती धर्माधिकारी, प्री-प्रायमरी हेड मा.शबाना खान, तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुन्या मा.सुनीता देशपांडे मॅडम, उपप्राचार्य मा.तुषार रेवतकर सर यांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा अभिमान पाहण्यासारखा होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा देशमुख व विशाखा मेंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी नांदने यांनी केले. प्री-प्रायमरी हेड मा.शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका प्रणिता जोशी , रेणुका सबाने , वर्षा देशमुख , आकांक्षा महल्ले , विशाखा मेंढे, स्नेहल दुर्गे,अश्विनी नांदने, ऋचा अडवलकर तसेच प्रायमरी विभागातील गौरव देवघरे, स्नेहा राजपूत,सचिन ऊइके ,तेजस तरले आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

veer nayak

Google Ad