धामणगाव रेल्वे,
श्री सिद्धिविनायक देवस्थान, कृष्णा नगर पॉलिटेक्निकच्या मागे धामणगाव रेल्वे येथे श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व सिद्धिविनायक देवस्थान च्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मंगरूळ येथील मंगला माता मंदिराचे मुख्य पुजारी श्री मोहन देव यांच्या नेतृत्वात तीन दिवस पर्यंत संपन्न विविध आयोजनाच्या निमित्ताने श्री गजानन माऊली मूर्तीची नगर परिक्रमा प्रमोद ( मुन्नाभाऊ) मुंदडा यांच्या निवासस्थानापासून तर मुख्य मार्गाने कृष्णा नगर येथील मंदिरापर्यंत नगरपरिक्रमा करण्यात आली श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन,श्री गणेश हवन, श्री नवग्रह हवन, सह महाराजांचा धान्याधिवास, जलाधिवास, फलाधिवास, नवनीत, धूप,आदिवास,शय्याधिवास तसेच माऊलींचा महा स्नान महा अभिषेक व माऊलींची प्राणप्रतिष्ठा मुख्य यजमान प्रमोद मुंदडा व सौ पूर्ण मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आली. सोबतच महाआरती व सामूहिक प्रार्थना आणि श्री सिद्धिविनायक देवस्थान कृष्णा नगर येथील श्री गणपती मूर्तीच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वार्षिक उत्सव आयोजित करण्यात आला याप्रसंगी या आयोजनांमध्ये धामणगाव नगरातील नगरातील तसेच कृष्णा नगर परिसरातील हजारो भाविक भक्तांनी उत्साहाने सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शविला वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने सामूहिक ध्यान,श्रींचा अभिषेक गोपालकाला कीर्तन सामूहिक प्रार्थना भजन संध्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच महाआरती व महाप्रसादाची सुद्धा आयोजन संस्थेचे आधार स्तंभ विलास कडू व सर्व संचालक मंडळाच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले