veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | । युट्युब
परिसरातील नागरिकांना घाण व दुर्गंधीचां करावं लागत आहे सामना,
चांदूर रेल्वे/ शहरातील बहुतांश मांस विक्रेते शहराबाहेरच मांस विक्री करताता, ज्यामुळे शहरातील नागरिकांना निर्माण होणाऱ्या घाण व दुर्गंधीच्या समस्येला सामोरे जावू लागु नाही, या उलट शहरातील काही मांस विक्रेते शहरात खुलेआम मांसविक्री करत असून, यामुळे निर्माण होणारी घाण व दुर्गंधी यां परिसरा तील नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. शहरातील गांधी चौक अमरावती रोड येथे काही मास विक्रेते आपल्या घरासमोर स्टॉल लावून रस्त्यावर खुलेआम कोंबडीचे मांस विकत असून हे मांस विक्रेते कोंबडी कापून कोंबडीची पिसे व घाण येथील उर्दू शाळेच्या मोकळ्या जागेत फेकून देत आहे, त्यामुळे परिसरातील रहिवासी व सध्या -शेजारील दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, त्याचाही या नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे ,नागरिकांनी याबाबत मांस विक्रेत्याला काही सांगताच , या मांस विक्रेते भांडण कराले ही मागेपुढे पाहत नाही , त्यामुळे परिसरातील नागरिक स्थानिक नगरपालिकेत लेखी तक्रार देण्याकरिता घाबरत आहे ,येथील काही नागरिकांनी या प्रकरणी स्थानिक नगरपालिके ल तोंडी तक्रार केली आहे, याविषयी स्थानिक नगरपालिका काय कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे,