धामणगाव रेल्वे
श्री विजयादशमी उत्सव म्हणजे हिंदू संस्कृतिचा पराक्रमाचा इतिहास आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासी बांधवांना एकत्रित करून दृष्ट शक्ती म्हणजेच रावणावर विजय प्राप्त केले श्रीरामांचा तो विजय केवळ रावणावर नव्हे तर अहंकारावर होता त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा सामूहिक विजयाचा उत्सव म्हणजेच विजयादशमी उत्सव हिंदू बांधवांच्या एकत्रिकरण आणि शक्ती चा गजर आहे बालांना सुसंस्कृत करणे आणि संघाच्या माध्यमाने राष्ट्र व समाज कार्यकर्ता घडवणे हेच संघाचे मुख्य कार्य आहे असे प्रतिपादन अमरावती महानगर शिवाजी नगराचे नगर कार्यवाह आशुतोष भुजाडे यांनी येथे व्यक्त केले ते धामणगाव नगरीच्या बाल श्री विजयादशमी उत्सवात बोलत होते सेवा स्मृति भवन संघ कार्यालयाच्या पटांगणवर आयोजित संघाच्या बाल श्री विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख अतिथि म्हणून डॉ.अपतूरकर प्रमुख वक़्ते अमरावती महानगर मधिल शिवाजी नगराचे नगर कार्यवाह आशुतोष भुजाडे,धामणगाव नगर कार्यवाह चेतन पोळ मंचावर उपस्थित होते.
भुजाडे पुढे म्हणाले की, पूर्वी गर्व से कहो हिंदू हे हे म्हणणे म्हणजे हिंदूंनाच अपराध वाटत होते परंतु आज संघाच्या ९९ वर्षाच्या प्रवासात संघाच्या प्रयत्नाने “गर्वसे कहो हम हिंदू है” हे गर्वाने म्हणने सहज झाले आहे भ्रमणध्वनीच्या या काळात सुद्धा संघाच्या शाखेमध्ये खेळ,संस्कार, आचार विचार,एकता शिकवली जाते आणि म्हणूनच संघाच्या शाखेमध्ये आपल्या बालकांना पाठवण्याचे आग्रह संघ समाजाला करतो
———————————– –
उल्लेखनीय पथसंचलन …..
बाल विजयादशमी उत्सवापूर्वी नगरातून घोष प्रमुख अतुल कडू यांच्या नेतृत्वात बालकांचे उल्लेखनीय पथसंचलन निघाले ५० च्या वर बालकांनी १० रचना नगरातून भ्रमण करताना वाजविल्या बालांचे पथसंचलन पाहून नगरवासांनी बालकांचे कौतुक केले व ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत केले
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अपतूरकर म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे शिशु आणि बालांकरिता जीवनात संस्कार घडवणारी शाळा आहे स्व:संरक्षण, राष्ट्र संरक्षण, समाज संरक्षण, संघाच्या माध्यमाने शाखांमधून बालांनाना शिकवले जातात बालमनावर संघाचे संस्कार घडणे आवश्यक आहे संघाचे संघटन म्हणजे राष्ट्राचे संघटन आहे असे सुद्धा ते म्हणाले
प्रास्ताविक संचालन व आभार बाल कार्य प्रमुख गौरव शिंदे यांनी व्यक्त केले उत्सवा प्रसंगी बाल स्वयंसेवकांनी घोषाचे प्रात्यक्षिक सादर केले