404 माता भगिनींनी घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कॅम्पमध्ये सहभाग.
आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी घेण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कॅम्प.
जुना धामणगाव कृष्णानगर येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पला आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिली भेट.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे.
या योजनेची धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी नोंदणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
आज धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगांव दशासर, चिंचपूर, आसेगाव, दाभाडा, वसाड, ढाकुलगाव व जुना धामणगाव कॉलनी परिसर आणि चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर, बागापुर चांदुरवाडी, अमदोरी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत कॅम्प घेण्यात आले. ज्यामध्ये 404 माता भगिनींनी या कॅम्पचा लाभ घेतला.