आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व इतर कक्षाच्या वतीने भव्य शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बेधुंदकार गोविंद पोलाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष विजय चौधरी तर स्वागताध्यक्ष प्रफुल क्षिरसागर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड वर्धा हे होते. यावेळी प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी विश्वासजी सिरसाट साहेब, कृषी अधिकारी कांबळे, अनिलजी गोहाड, प्रणिता हिवसे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली. त्यांनतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन हिवाळे यांनी केले तर लकी लोखंडे याने शिवगर्जना सादर केली.
यावेळी प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी विश्वासजी सिरसाट, प्राणिताताई हिवसे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रफुल क्षिरसागर यांनी शिवशाहीची आजच्या काळातील गरज लक्षात घेऊन शिवकुळाचा विचार समाजात पेरण्याची नितांत गरज असून प्रतिगाम्यांचे हल्ले आता उधळून लावण्यासाठी पुरोगामी चळवळींनी एकत्र आले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गोविंद पोलाड यांनी प्रखरपणे शिवचरित्राची मांडणी करत आज समाजात फोफावत चाललेली अंधश्रद्धा मोडून काढत शिवशाही राबवली पाहिजे. तसेच शिवाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन रवींद्र घाडगे तर आभार प्रदर्शन प्रमोद नागरे यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला शिवप्रेमींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रोहण हिवाळे, प्रशांत ढवळे, संतोष डंभारे, संजय किटे, मारोडकर सर, समीर खोंडे, नरेश निनावे, सविनय काळे, योगेश बरवत्कर, शुभम राजे, छाया बावणे, कविता अजमिरे, लीलाधर गुल्हाने, मयुरी लोखंडे, निलेश घुगरे, वीर कठाणे, मोहित गिरी, पवन भोबेकर आदींनी सहकार्य केले.