दिनांक: २०/ ०२/२०२६
एस. ओ. एस. कब्स येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.समाजसुधारकांची जयंती साजरी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श विदयार्थ्यासमोर ठेवणे हा होता.
छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० मध्ये महाराष्ट्रात पुणे येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. आणि त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते, त्या एक धार्मिक आणि राष्ट्रप्रेमी महिला होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना बालपणापासूनच युद्ध कला, घोडस्वारी आणि राजकारणाची शिक्षा दिली होती. जिजामाता ने शिवरायांच्या मनावर रामायण आणि महाभारत कथेची छाप सोडली होती.

या कार्यक्रमामध्ये के जी २ चे विद्यार्थी ओजस मनोज पांडे शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आणि स्वरांगी आकाश येंडे जिजामातेच्या वेशभूषेत आले होते.
प्रि. प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.
या शुभप्रसंगी प्रि.प्रायमरी हेड मा. शबाना खान यांनी आपल्या* भाषणातून छत्रपती शिवाजी .महाराजांच्या शौर्य, शुर, दुरदुष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला तसेच विद्यार्थ्याना त्यांच्या जीवनातील आदर्श आणि गुणांना आत्मसात करण्यास सांगितले. त्यांनी हेसुद्धा सांगितले नौदल सेनेचा शोध शिवाजी महाराजांनी लावला होता.
शिक्षिका रेणुका सबाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या नेतृत्व गुणांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्याना राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा आत्मसात करण्याचा संदेश दिला. शिवगर्जनेसोबत त्यांनी आपल्या शब्दानां पूर्णविराम दिला.
प्रि. प्रायमरी हेड मा.शबाना खान याच्यां मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता जोशी, वर्षा देशमुख, रेणुका सबाने, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदणे, स्नेहल दुर्गे, ऋचा अलवाडकर यांनी सहकार्य केले.















