चेतन पसारी यांना देवर्षी नारद पुरस्कार. विश्व संवाद केंद्र पत्रकार सन्मान सोहळा

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

अमरावती विश्व संवाद केंद्र, अमरावतीद्वारे आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंतीनिमित्त अमरावती विभाग पत्रकारिता सन्मान सोहळ्याचे आयोजन श्री हव्याप्र मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात करण्यात आले होते.

या सोहळ्यात स्व. त्रिवेणीताई सुखदेवराव बोंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्रिवेणी चौरटेबल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. वसुधा अनिल बोंडे पुरस्कृत ग्रामीण भागातून तत्परतेने वृत्त संकलनासाठी 

धामणगाव रेल्वे तालुका चे जेष्ठ पत्रकार चेतन पसारी यांना देवर्षी नारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ११ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, प्रमुख अतिथी म्हणून कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायोइंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक विजय राऊत, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक उल्हास बपोरीकर, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संदीप गुळवे उपस्थित होते. खा. अनिल बोंडे यांची कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार गोगरकर, संचालन अमरावती विभाग प्रचार प्रमुख सौरभ लांडगे व आभार प्रदर्शन अमरावती महानगर प्रचार प्रमुख राहुल गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शिवानी भेंडारकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाला प्रचार विभागाचे सर्व सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

veer nayak

Google Ad