चांदुर रेल्वे / चांदुर रेल्वे पोलिसांनी मालखेड येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून दोन लाख 84 हजार 960 रुपयांचा मुद्देमाला सह नऊ आरोपींना ताब्यात घेतल्याची कारवाई 27 जून शुक्रवार रोजी केली, मिळालेल्या माहितीनुसार चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड या गावातील आठवडी बाजार येथे काही इसम इकाका बादशाह हारर्जीत चा जुगार खेळत असताना सदर कारवाई करण्यात आली,
यावेळी चांदुर रेल्वे पोलीस एका खाजगी वाहनाने मालखेड येथे जुगार अड्ड्यावर शिस्तीने जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यावर जुगार खेळणाऱ्या 9 इसमांना तब्येत घेऊन त्यांच्या जवळील 7 हजार 960 रु, तीन अँड्रॉइड मोबाईल 30 हजार 4 साधे मोबाईल किंमत 2 हजार रुपये तसेच चार दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख 84 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून आरोपींवर कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला,
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे, अमलदार शिवाजी घुगे, निलेश रिठे, गजानन वाघमारे, प्रवीण मेश्राम, अतुल क्षीरसागर, प्रशांत ढोके यांनी केली,