चांदुर रेल्वे : जनतेची पहिली पसंती ठरत आहेत सौ. प्रियंका निलेश विश्वकर्मा!

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराला मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष ठरत आहे.

शहरातील सर्व प्रभागांमध्ये सौ. प्रियंका विश्वकर्मा यांच्या प्रचारयात्रांना महिलांचा जबरदस्त सहभाग, तरुणांचा उत्साह आणि नागरिकांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे. स्वच्छ, सुंदर आणि विकासाभिमुख चांदुर रेल्वे या त्यांच्या संकल्पनेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सौ. विश्वकर्मा यांच्या संवाद यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत खांद्याला खांदा लावून प्रचारात जोशात सहभाग नोंदवला. तरुण वर्गही उत्साहाने त्यांच्यासोबत फिरताना दिसत असून शहरात “बदल आणि विकास” या मुद्द्यांवर चर्चा रंगल्या आहेत.

यामुळेच अनेकांच्या मते —

“चांदुर रेल्वेतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा जबरदस्त पाठिंबा आणि तरुणांचा जोश — नगराध्यक्ष पदासाठी जनतेची पहिली पसंती ठरत आहेत सौ. प्रियंका निलेश विश्वकर्मा.”

veer nayak

Google Ad