अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक १/११/२०२४ शुक्रवारला दुपारी १२.०० वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त ‘चंदनऊटी-कार्यक्रम’ आयोजित करण्यात आलेला आहे.रात्री ‘दिपावली’ निमित्त संस्थान मध्ये विश्वस्त मंडळाचे उपस्थित महाराजांची गाथा सह लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.
दि.२/११/२०२४ शनिवार रोजी दुपारी १.०० वाजता बलिप्रतिपदेला संस्थानचे गोरक्षणमध्ये ‘गायीगोंधन’ निमित्त सर्व गायींना पुरणपोळी देवून पुष्पहार सह पूजन करून महाराजांची ‘बजराम गाय माझी खरी’ ही ओवी आणि ‘आरती अकासवाणी’ ही आरती म्हणून गोरक्षण कर्मचारी यांना शेला,टोपी, वस्त्रे,साडी व नारळ देवून संस्थानचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थान तर्फे संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामण रामटेके,गोविंद राठोड,दिगांबर राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,वैभव मानकर, स्वप्निल चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.