अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ५/७/२०२४ शुक्रवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” आणि रात्री ८.०० वाजता अवधूत नाम प्रबोधनकार समिर झाडे महाराज, वायगाव (निपाणी) जि.वर्धा यांचा “प्रवचन कार्यक्रम” आयोजित करण्यात आलेला आहे.
चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता “महाप्रसाद कार्यक्रम” महाप्रसाद-दाते गुणवंत सुपले,मोर्शी जि. अमरावती यांचे तर्फे व संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वै.नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर रा.राऊत, सचिव अशोक ह.सोनवाल सर्व विश्वस्त विनायक तु.पाटील,वामण के.रामटेके,गोविंद रा.राठोड,दिगांबर ना.राठोड,अनिल दि.बेलसरे,फुलसिंग रु.राठोड,चरणदास ना.कांडलकर,वैभव दि.मानकर, स्वप्निल ब.चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.