सावंगा विठोबा नगरीत “अमावस्या” निमित्त “चंदन उटी” कार्यक्रम आणि “श्रावण मास मांड शुभारंभ”

0
80
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ४/८/२०२४ रविवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” आणि रात्री ८ ते १० वा. अवधूत नाम प्रबोधनकार भाऊदास नान्हे महाराज,वासणी(खूर्द) जि. अमरावती यांचा “प्रवचन कार्यक्रम” आयोजित करण्यात आलेला आहे.


चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता “महाप्रसाद कार्यक्रम” महाप्रसाद-दाते रवी विघे,अमरावती यांचे तर्फे व संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे.
संस्थानमध्ये दि.४/८/२०२४ रोजी सकाळी “श्रावण मास मांडीचा शुभारंभ” संस्थानचे लहान मंदिरात “ढाल” बसवून विश्वस्त मंडळाचे उपस्थित होत आहे.दि.५/८/२०२४ ते दि.८/९/२०२४ पर्यंत संस्थान तर्फे “श्रावण मास” निमित्त “अखंड जागृती भजन” मांडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गावातील आणि बाहेर गावातील अवधूत भजन मंडळांचा सहभाग राहणार असून या करिता संस्थानचे वतीने नियोजन करण्यात आले आहे.संस्थान तर्फे सहभागी अवधूत भजन मंडळाचा सन्मान करण्यात येऊन दैनंदिन चहा,नास्ता आणि भोजन इ.व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वै.नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर रा.राऊत, सचिव अशोक ह.सोनवाल सर्व विश्वस्त विनायक तु.पाटील,वामण के.रामटेके,गोविंद रा.राठोड,दिगांबर ना.राठोड,अनिल दि.बेलसरे,फुलसिंग रु.राठोड,चरणदास ना.कांडलकर,वैभव दि.मानकर, स्वप्निल ब.चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad