धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची आज मासिक सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्य प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करण्यात आले. सदर सभेत संचालक श्री सचिन गुणवंतराव सोमोसे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी प्रस्तावा मध्ये मत व्यक्त केले की, चामणगांव कृषि उत्पन्न बाजार बाजार समितीचा १२५ वर्षाचा इतिहास आहे. यामध्ये कार्यरत संचालक मंडळ पदारुढ होऊन एक वर्षाचा कालावधी झाला या कार्यकाळात बाजार समितीच्या वार्षिक उत्पादनामध्ये विक्रमी वाढ झाली असुन यापुर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे.
त्यामुळे संपुर्ण संचालक मंडळ, सभापती सौ. कविता श्रीकांत गावंडे व उपसभापती श्री मंगेश अशोकराव बोबडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच बाजार समितीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री भरत ठाकरे यांची मुलगी कु.दिव्यानी ठाकरे हिने सि.बि.एस.सी बोर्ड दहावीच्या परिक्षेत नवोदय विद्यालय, अमरावती येथुन ९९% गुण मिळविल्याने तिचा व वडील श्री भरत ठाकरे यांचा सुध्दा संचालक मंडळाचे हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी समितीच्या सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती श्री मंगेश अशोकराव बोबडे, संचालिका सौ. चंदा रामदास निस्ताने, डॉ. श्री प्रमोद रा.रोंघे, श्री विपीन शरदराव ठाकरे, श्री रविन रतनलाल भुतडा, श्री सचिन गुणवंतराव सोमोसे, श्री संदीप भिमराव दावेदार, सौ मेघा प्रशांत सबाने, सौ संगिता संजय गाडे, श्री दिनेश रामभाऊ जगताप, श्री देवराव चंद्रभानजी बमनोटे, श्री मुकुंद बाबाराव माहोरे, श्री विलास लक्ष्मणराव भिल, श्री प्रशांत यशवंतराव हुडे, श्री गिरीष सोहनलाल भुतडा, श्री राधेश्याम लक्ष्मीनारायण चांडक, श्री सुनील शेषराव ठाकरे, समितीचे सचिव श्री प्रविण साहेबराव वानखडे व लेखापाल विनोद वासुदेवराव जांभेकर यांचे सह सर्व कर्मचारी हजर होते.