राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : दि. 12 जानेवारीला संभाजी ब्रिगेड आर्वी द्वारे आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रम आर्वी येथील साईनगर येथील उद्यानात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्रा.मा.विजय चौधरी, प्रमुख अतिथी म्हणून से.प्रा.मा. संजय वानखडे सर, प्रमुख वक्त्या सौ शुभांगी डंभारे मॅडम, प्राध्यापिका मोहोड मॅडम, वानखडे मॅडम, सौ शुभांगी गाठे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे यांनी तर प्रास्ताविक प्रशांत ढवळे यांनी केले.
कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व गणमान्य नागरिक शिवप्रेमी महिला, तरुण युवक व युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी साठी संभाजी ब्रिगेडच्या निलेश घुगरे, सविनय काळे, मोहीत गिरी सहित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad