स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा. जनजागृती निमित्ताने रॅली चे आयोजन

0
44
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जागतिक वसुंधरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. वसुंधरा दिनानिमित्त एस ओ एस कब्स पासून ते गांधी चौक पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा , शाळेच्या पर्यवेक्षिका शबाना खान वर्ग दहावीचे विद्यार्थी ,वर्ग शिक्षक शुभम मिश्रा विज्ञान शिक्षक विश्वास हिंगवे उपस्थित होते. रॅली काढण्यामागचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील वाढत असलेले प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी असा होता.

रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी वसुंधरा दिनानिमित्त विविध सुविचारांचे पोस्टर तयार केले. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा आणि विज्ञान शिक्षक विश्वास हींगवे यांनी वसुंधरा दिनानिमित्त मार्गदर्शन केले. वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषण दिले . कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा आणि येलो हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.

veer nayak

Google Ad