धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी ” राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला..
राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, कार्यक्रमाचे अतिथी विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल लाहोटी, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक अनुप अग्रवाल तसेच सचिन कुर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते..

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक सचिन कुर्लेकर यांनी केले त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. विद्यालयात उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या..

राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून ओम गावंडे (वर्ग सातवा ) याने सर सी. व्ही. रमण, अभय गायकवाड (वर्ग सातवा) याने अल्बर्ट आईन्स्टाईन, पूर्वा महल्ले (वर्ग सातवा) हिने टॅसी थॉमस, खुशी पगारिया (वर्ग सातवा) हिने मेरी क्युरी या सर्व शास्त्रज्ञांचे भूमिका साकारल्या. तसेच वर्ग आठवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट नाटिका सादर केली…
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणा मध्ये विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले..आपल्या दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सर्वांना विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. या कार्यक्रमाचे संचलन वर्ग आठवीच्या विद्यार्थिनी आराध्या डेहनकर व कशिश मनवर या विद्यार्थिनींनी केले.. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षिका श्रुतिका टाले यांनी केले या कार्यक्रमाला वर्ग पाचवी ते आठवीचे सर्व विद्यार्थी व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सर्व विज्ञान शिक्षक यांनी परिश्रम घेतले…

















