श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथील प्लेसमेंट सेलद्वारा श्री श्याम देशमुख पुणे यांचे करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन. 

0
28
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचलित, श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे प्लेसमेंट सेल द्वारे दिनांक २४/१/२५ रोजी श्री श्याम देशमुख संस्थापक Apti smart solutions Pune, सॉफ्टवेअर अभियंता, करिअर समुपदेशक, सल्लागार व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च श्रेणी प्राप्त यांनी श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या एक दिवशी कार्य शाळेसाठी विचार मंचावर श्री श्याम देशमुख पुणे, श्री संत शंकर महाराज आश्रम चे विश्वस्त श्री संजू भाऊ देशमुख, महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी राजूभाऊ भोगे, प्राचार्य सी यु पाटील ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिपक बोंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्राचार्य डॉ. सी यु पाटील यांनी प्रास्ताविक केले. व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर सॉफ्टवेअर अभियंते श्री. शाम देशमुख पुणे यांनी या एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बीएससी (ऑनर्स) कृषी पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण करताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. यादरम्यान बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यासक्रम याबद्दल माहिती व मुलाखतीसाठी आवश्यक संवाद कौशल्य, समूह चर्चा व इतर आवश्यक गोष्टींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुकन्या ठाकरे हिने केले. तर आभार प्रदर्शन कुमारी पायल गवई हिने केले.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्लेसमेंट सेलचे चेअरमन श्री. अनिल चव्हाण, प्रा. आकाश सुने, प्रा.परीक्षित राऊत, प्रा. निलेश शेळके, प्रा.मनीषा लांडे,प्रा. प्रतीक मेहंद्रे, प्रा. कल्याणी जाधव, श्री. सुहास अप्तुरकार, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी यांच्या मूल्य सहकार्य प्राप्त झाले.

veer nayak

Google Ad