जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
शिराळा
( ब्रा. गों ) येथील शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम रोखण्यासाठी १० फेब्रुवारी ला मनीष धुर्वे यांचे आमरण उपोषण ! केम्स जुपीटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई व संबंधित कंपनी व्दारे मौजे ब्राम्हणवाडा गोंविदपुर गट नं २४७ मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण अनधिकृत रित्या व बेकायदेशीर होत असलेल्या कामाला स्थगिती देण्याची मागणी जिल्हा उपाध्यक्ष ( बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य ) मनिष हरिदास धुर्वे ब्राम्हणवाडा गोंविदपुर यांनी केली आहे.
सदर बांधकामाला स्थगिती देवुन कायदेशीर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा गोंविदपुर यांनी २४-८-२३ रोजी दिलेली बेकायदेशीर व महसूल अधिनियमाचे उल्लंघन करत नाहरकत प्रमाणपत्र ग्रामसभा ठराव संबंधित वरिष्ठ विभागाकडून मान्यताप्राप्त पत्र व संबंधित विभागाची पुर्व परवानगी नसल्याने नाहरकत व ग्रामसभा ठराव रद्द करण्यात यावा. या संदर्भात मा.जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेब, मा. पोलीस अधिक्षक साहेब सर्व अमरावती तसेच अमरावतीचे खा. बळवंत वानखडे निवेदन दिले आहे.
त्याशिवाय तहसीलदार साहेब अमरावती यांना खासदार बळवंत वानखडे यांनी या संदर्भात पत्र दिले आहे. मनिष हरिदास धुर्वे यांनी ग्रामपंचायत ला निवेदन देवून लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला १० फेब्रुवारी ला १० वाजुन ५५ मिनिटांनी बसणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील ही दखल घेण्याची मागणी सुध्दा मनिष हरिदास धुर्वे यांनी केली आहे.
उपोषणा बाबत मा.खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री अँड यशोमतीताई ठाकुर, कार्यकारी अभियंता स व सु विभाग अमरावती ग्रामीण, कार्यकारी अभियंता प्रकल्प म. रा.वी वेलकम पाॅईट अमरावती, ठाणेदार माहुली जहांगीर, सरपंच, सचिव ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा गोंविदपुर, पोलीस आयुक्त अमरावती, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना निवेदन देण्यात आले आहे.