आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आलेली आहे पक्षाचे मोठ-मोठे नेते देखील प्रचाराकरिता मैदानात उतरलेले आहे. नेताजी वार्डातील मोनू खुणे याची पत्नी ही प्रभावी उमेदवार ठरत असून काहींना तर या तुल्यबळ समाज उमेदवाराची भीती सुद्धा वाटू लागली आहे. आपले २० वर्षापासून संबंध आहे तुमच्या उमेदवारा पासून माझ्या सुनेला धोका आहे अशी देखील सांगितले. आपण भरलेला फॉर्म मागे घ्या अशा राष्ट्रसंत वार्ड प्रभाग क्रमांक ७ मधल्या महिला व्यक्तीला समजावण्या करिता तीन-तीन वेळा घरी जाऊन प्रयत्न होत आहे. परंतु ती व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असून मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. व मी तो पूर्ण करणार व सर्व समाज माझ्या पाठीशी आहे. समाजाने माझ्या कार्याची दखल घेऊनच सर्व समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं प्रचारातून प्रभाव दिसत आहे तेव्हाच कुठेतरी दोन्ही तुल्यबळ पक्षाकडून फॉर्म मागे घ्या अशी विनंती देखील वारंवार करण्यात आली होती परंतु माझ्या प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तळा जाऊ देणार नाही मी माझा फॉर्म मागे घेणार नाही उद्धव ठाकरे शिवसेना गटाची साै. आरती सुमित खुणे (माेनु) महिला उमेदवार अशा आपल्या भूमिकेवर ठाम आहे.














