(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगरूळ दस्तगीर यांचे सहकार्याने रक्तशय व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच ग्राम शिदोडी येथे करण्यात आले होते .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक बोंद्रे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पवन शिवणकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ दस्तगीर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ नारनवरे, डॉ रंगले, कुमारी किरण ढोमणे, राहुल ठाकरे, अनिकेत पिंपरे, नूतन झुनझुन कर, सुमित भेंडे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व परमहंस सद्गुरु श्री. संत शंकर महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आरोग्य पथकाद्वारे ४० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व २२ गावकऱ्यांची अननेमिया व सिकलसेल तपासणी करण्यात आली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. संदीप हाडोळे व महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.
सिकलसेल व रक्तक्षय तपासणी शिबिरासाठी शिदोडी गावच्या सरपंच सौ करिष्मा ताई शिवरकर, उपसरपंच श्री रितेश निस्ताने, पोलीस पाटील सौ. संजीवनी निस्ताने, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,स्थानिक व्यवस्थापन पदाधिकारी श्री राजू भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख प्राचार्य वृषाली देशमुख सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.