स्थानिक राजकारण – जिल्ह्याच्या अध्यक्षाना व प्रमुख पदाधिकारी यांना महायुती च्या सभेत स्थान नसल्याने पदाधिकारी भडकले
देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना, आणि वर्धा जिल्ह्यात अगदी तापमान आणि निवडणुकीचे वातावरण तापले असताना, एकीकडे विरोधात असलेले महाविकास आघाडी च्या सक्रिय नियोजन बद्ध पद्धतीने निवडणुकीचे रणशिंग फुकल्याच चित्र वर्धा जिल्ह्यात असून, महाविकास आघाडी त्यांच्या मित्र पक्षांना अतिशय सन्मान जनक रूपाने सोबत घेऊन काम करण्याच चित्र आहे, तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात तीन आमदार असलेली भाजपा मात्र पूर्णपणे अहंकारी भूमिकेत दिसून येत आहे, आर्वी हिंगणघाट, आणि वर्धा तीन विधानसभा क्षेत्रात भाजपा चे आमदार असून पुलगाव – देवळी काँग्रेस चे आमदार असताना यां चार ही विधानसभा क्षेत्रात अजितदादा पवार विचाराची राष्ट्रवादी आपली संघटनात्मक बांधणी ची परिस्थिती पूर्वी पेक्षा जास्त उत्तम आणि मजबूत करताना दिसत आहे, तसेच यां निवडणुकीत त्यांचा फायदा भाजपा व महायुती च्या उमेदवाराला होईल परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या वयक्तिक, राग व हट्टा आणि अहंकारा साठी महायुती च नुकसान करण्याच काम करत, भाजपा चे स्थानिक प्रतिनिधी करत असल्याची नाराजी राष्ट्रवादी त दिसून येत आहे आज उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी च्या झालेल्या हिंगणघाट च्या सभेत वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांना न बोलावल्या मुळे जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व कार्यकर्ते संतप्त झालेले आहे, एरवी भाजपा कुठे ही मित्र पक्षाला सोबत घेण्याच्या भूमिकेत दिसत नसल्याने महायुती त आलबेल नसल्याची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस आणि राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या कडे प्रत्यक्षात भेट घेऊन माहिती देणार असल्याचे पत्रकातून सांगितले असून याची माहिती पदाधिकारी यांनी पत्राद्वारे वरिष्ठाना दिली असल्याचे सांगितले,