धामणगाव (रेल्वे)
हा दिवस शाकाहारी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो.
या दिवसाचा उद्देश शाकाहार आणि पर्यावरण रक्षणाचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
शाकाहारी राहून आपण केवळ आपले आरोग्यच सुधारत नाही, तर पर्यावरणाचे रक्षण आणि प्राण्यांच्या कल्याणासाठीही हातभार लावतो.
शाकाहारी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि लोकांना त्याच्या फायद्यांबद्दल जागरुक करणे हा त्याचा उद्देश होता. प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान आणि शिक्षिका आकांक्षा महल्ले यांनी मुलांना सांगितले की, शाकाहार केल्याने त्यांचे आरोग्य सुधारते, पर्यावरण रक्षणात मदत होते आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी हातभार लागतो.
शाकाहारी अन्न ऊर्जा आणि ताजेपणा प्रदान करते.
शाकाहारी राहून आपण आपले जीवन सुधारू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो ही माहिती जागतिक शाकाहारी दिवसाबाबत देण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थी विविध भाज्या व फळे यांच्या वेशभूषेत आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी फळे व भाजीपाला रॅम्पवॉकचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. प्रचिती धर्माधिकारी व प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे, श्रद्धा रॉय, अश्विनी नांदने यांनी सहकार्य केले.