अमरावती (प्रतिनिधी) गेल्यां २०ते २५वर्षापासून अमरावती जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये प्रामाणिकपणे अविरत कार्य करणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा ,भिम सेना तसेच प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दीनी दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. आंबेडकरी सामाजिक कार्यकर्त्यांना भविष्यात प्रेरणा व ऊर्जा मिळावी तसेच आंबेडकरी चळवळीचे कार्य अधिक गतिमान व्हावे या उदात्त हेतूने भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाच्या वतीने आंबेडकरी प्रबोधनकार व गायक प्रकाशदीप वानखडे, माजी नगरसेवक तथा महानायक संघटनेचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, दलित पॅंथरचे नेते प्रदीप महाजन, रावसाहेब गोंडाणे, भीम क्रांती संघटनेचे अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांचा सत्कार शौर्य दिनी भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दादासाहेब पी बी खडसे तसेच भंते विनय वंश लंकारा ( श्रीलंका), माजी शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव हिवराडे गुरुजी, विशुद्धानंद जवंजाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे , आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह चपराशीपुरा येथे करण्याचे आयोजित केले आहे तरी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री मनोज ढवळे, एडवोकेट नवनीत कोठाळे राहुल रामटेके एडवोकेट बेला टीबड़ेवाल, सरपोर्द्दीन पठाण, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते अजय मंडपे, रवी इंगळे इत्यादींनी केले आहे.
Home आपला विदर्भ अमरावती भीमा कोरेगाव शौर्य दीनी आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा. भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे...