भारत शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था आर्वीला विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त. 

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी :- भारत शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित आर्वी र. नं. ११५ हिला विदर्भ क्रेडीट को-ऑपरेटिव फेडरेशन अमरावती द्वारे कर्मचारी पतसंस्था गटातुन सन २०२४-२०२५ करिता विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार प्राप्त करणारी वर्धा जिल्ह्यातील एकमात्र पतसंस्था आहे. 

   अमरावती येथे आयोजित विदर्भस्तरीय पतसंस्थाच्या कार्यशाळा कार्यक्रमात संस्थेच्या वतीने पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. गणेश मोहोड ,मानद सचिव सचिन दिघडे,संचालक मोहन तायडे, विलास येडमे,व्यवस्थापक आशिष हिवसे व लेखापाल सुरज पवार यांनी मा. श्रीमती सईताई डहाके, आमदार, कारंजा, सौ. सुलभाताई खोडके, आमदार, अमरावती या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार र्स्वीकारला.

 पत संस्थेच्या सभासदांनी व कर्मचारी यांनी दिलेले सहकार्य व माजी संचालक मंडळांनी पतसंस्थेच्या प्रगती करता केलेल्या कार्यातून दुसऱ्यांदा संस्थेला विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार पतसंस्थेला प्राप्त होऊ शकला व पतसंस्थेचे व सभासदाचे हीत जोपासून उत्तरोत्तर प्रगती करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाद्वारे केला जाईल असा विश्वास कार्यरत पदाधिकारी व संचालकानी व्यक्त केला .

 

 

  पतसंस्थेला विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार २०२४-२५ करिता प्राप्त झाल्याबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या सचिव अॕड. शोभा ताई काळे, उपाध्यक्ष दिनेशराव देशमुख,प्रदिपराव काळे, संदीप काळे,पत संस्थेचे अध्यक्ष अभिजीत काळे ,खजिनदार विजय पवार तसेच पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व सभासद सुनील इंगोले,डॉ.प्रा.अविनाश कदम, प्रा. अभय दर्भे, डॉ. प्रा.रवींद्र सोनटक्के, तसेच पत संस्थेचे सर्व आजी व माजी संचालक,सर्व सभासद बंधू भगिनी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .

veer nayak

Google Ad