आर्वी, ता. प्रतिनीधी पंकज गाेडबाेले
आर्वी : मंगळवारी (ता.७) देणार मागणीचे निवेदन
आर्वी,दि.५:- अनुसूचीत जमातीच्या (एस टी) यादीत बंजारा समाजाचा समावेश करावा या मागणी करीता आर्वी विधान सभा क्षेत्रातील सुमारे १५ तांड्यातील शेकडो बंजारा बांधव मंगळवारी (ता.७) धडक मोर्चा काढणार असुन उपविभागीय अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
निजाम प्रांतातील हैदराबाद गॅझेट व सिपी ॲन्ड बेरार च्या आरक्षण यादीत बंजारा समाजाची अनुसूचीत जमातीच्या यादीत नोंद असुन आरक्षण सुध्दा मिळत होते. त्यानंतर राज्यांची पुर्न प्रांत रचना झाल्यामुळे विदर्भासह मराठवाडा, खानदेशचा भाग महाराष्ट्रासोबत जोडल्या गेला. त्यामुळे गत पंच्याहत्तर वर्षा पासुन बंजारा समाजाला मुळ आरक्षणा पासुन वंचीत रहावे लागत आहे. महाराष्ट्रातील बंजारा व तत्सम जमाती जवळ १९५० पुर्वीचे अनुसूचीत जमातीचे दुर्मीळ पुरावे सुध्दा आहेत. जन्मजात गुन्हेगारी कायद्याने समाज बाधीत असुनही सेंट्रल प्रोवीन्स व बेरार प्रांता मध्ये तसेच हैद्राबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाला अनुसूचीत जमातीच्या यादीत स्थान देण्यात आले होते.
मात्र भाषावार प्रांतरचना, राज्य पुर्नरचना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील बंजारा, लमाण, लंबाडी व तत्सम जमातीना बसला असल्याने मोठ्या प्रमाणात समाजाला अन्याय सहन करावा लागत आहे. यातुन समाजाची सुटका करण्याकरीता हैद्राबाद गॅझेट मधील व सिपी अन्ड बेरार अनुसूचीत जमीतीच्या यादी मधील नोंदीची दखल घेवुन बंजारा व तत्सम जमातीसाठी गॅझेट लागु करुन अनुसूचीत जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागु करावे अशी मागणी बंजारा कृती समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.
या मार्च्यात विधान सभा क्षेत्रातील बंजारा समाजाच्या सर्व बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सखल बंजारा समाज आरक्षण कृती समीती आर्वी, आष्टी, कारंजाच्यावतीने करण्यात आली आहे.












