चांदुर रेल्वे – शहरातील संत श्री गजानन महाराज मंदिर,भगवंत चौक,चांदूर रेल्वे येथे” बाल संस्कार वर्ग “चे आयोजन करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले,यावेळी.प्रा.विश्वास दामले सर, लिटिल स्टार इंग्लिश स्कूल, चांदूर रेल्वे हे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंधार आणि प्रकाश याचा अर्थ व गमक विषद करून अत्यंत अवर्णनीय व अविस्मरणीय असे विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बंडू आंबटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांनी आपल्या जीवनातील केलेल्या विशेष कार्याची महती विषद केली.तसेच विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभकामना दिल्या यावेळी गायत्री परिवारावाच्या शकुंतला अग्रवाल व सहकारी महिला साधक यांनी सविता राजेंद्र गोसावी यांचा विधिवत दिप यज्ञ करून जन्म दिवस साजरा करून त्यांच्या उत्तरोत्तर कार्यासाठी व भविष्यासाठी शुभकामना दिल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिक गुडदे काका, सतीश निमजे,प्रवीण निमजे रमेश केने,संजय मोदी,अतुल दामले,पंडित पात्रिकर हे सपत्नीक हजर राहून यांचे तसेच संत श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळातील सर्व सदस्यांचे आयोजकांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर राजेंद्र गोसावी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून नूतन वर्षाच्या शुभ पर्वावर बाल संस्कार वर्गाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास घडविण्याचा मानस व्यक्त करून ” व्यक्ती कल्याण ते विश्व कल्याण ” ही संकल्पना राबविण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचा निरोप समारंभ सूर्यकांत गुडदे यांनी केली. या कार्यक्रमा दरम्यान २०० ते २५० भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा,आरती व प्रसादाचा लाभ घेतला.















