बागडे लेआऊट येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

लेआउट मधील महिलांनी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा दिला संदेश

13 मे रोजी बुद्ध गीताचा कार्यक्रम आयोजित करून दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

अमरावती : प्रतिनिधी 

वडाळी प्रभाग क्र ९ अंतर्गत बागडे लेआऊट सुधार समिती तर्फे 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम पंचशील झेंडाचे ध्वजारोहण करण्यात आले. व त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्ध वंदना घेऊन महिलांनी भगवान बुद्धाची गीते गायन केली लहान मुलानी सुद्धा यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला तसेच या प्रसंगी वाढते तापमान उच्चांक बघून बागडे लेआउट मधील रहिवासी महिलांनी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला सर्वात जास्त ऑप्शन देणारी झाडे लावावी जेणेकरून येणाऱ्या काळात तापमानाची घट होईल बागडे लेआऊट सुधार समितीचे पदाधिकारी सदस्य रहिवाश्यांनी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी 13 मे रोजी सुधार समितीच्या वतीने बुद्ध गीताचा कार्यक्रम घेण्यात आला होता

नव्याने निर्माण केलेल्या सुधार समितीचा लेआउट मधील समस्यासाठीच नव्हे तर समाजाला नागरिकांना विद्यार्थ्यांना विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेऊन जागरूकता एकतेचा संदेश दिला येत्या काळातही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवली जातील लेआउट मधीलच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना सामाजिक उपक्रमातून सक्षम जागरूकता राबवण्याचं कार्य करण्याची तयारी दर्शवली आहे 13 मे रोजी बुद्ध गीताचा कार्यक्रमांमध्ये गायक म्हणून विशाल खाकसे, विशाल मेश्राम बाळासाहेब इंगोले, शिल्पा पाटील या गायकाच्या मंचांनी अप्रतिम असे गीत गायन करून सामाजिक प्रबोधन केले नागरिकांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढवली व यानिमित्ताने लेआउट मधील दहावी ,बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यामध्ये, 

पूर्वा संतोष गायकवाड 10 वी – ९०% 

 कैवल्य धिरज पंडित –10 वी ८५%

 आर्यन धनराज कांबळे 10 वी – ८३%

प्राची राहुल मेश्राम 10 वी – ७५%

खुशी नंदकिशोर बोरकर– १२वी – ७०%

 तेजस मनोज गजभिये – १२वी – ७०%

याविद्यार्थ्याचे अजून मनोबल वाढावे यासाठी त्यांचे स्वागत करून त्यांना छोटीसी गिफ्ट देऊन त्यांना गौरवण्यात आले व बुद्ध गीताचा मंच नंदकिशोर बोरकर यांनी उपलब्ध करून दिला त्यांचे पण स्वागत करण्यात आले यामध्ये सर्व बागडे लेआउ ट सुधार समिती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांनी अतिशय परिश्रम घेतले व बुद्ध गीताचा कार्यक्रम घडवून आणला.

veer nayak

Google Ad