आष्ट्यात सव्वा दोन लाख भाविकांची उपस्थिती भिकुजी महाराज जन्मोत्सव सोहळा दोनशे बारा पालख्यांचा सहभाग

0
912
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :- दोन जिल्हा सिमेच्या मध्यभागी असलेल्या वर्धा नदी तिरावरील संत योगी भिकुजी महाराज यांच्या जन्मोत्सवाला आज तब्बल सव्वादोन लाख भाविकांची उपस्थिती होती़.. दरम्यान राज्यातील दोनशे बारा पालख्या सहभागी झाल्या.. तर पहिला बहुमान पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी पालखीला मिळाला आहे़..
अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यात वर्धा नदी तिरावर मागील अनेक वर्षा पासून संत योगी भिकुजी महाराज यांचे आष्टा हे गाव तिर्थक्षेत्र आहे़. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या जन्मोत्सव सोहळ्याचा रविवारी सांगता झाली.. विदर्भातील सव्वादोन लाख भाविकांनी आज पहाटे पासून भिकुजी महाराज यांचे दर्शन घेतले.. दरम्यान सायंकाळी सात वाजता नंतर एक किलोमिटर पर्यंत दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती़.
मध्यरात्री दोन क्विंटलचा केक कापण्यात आला.. सोमवारी पहाटे ४ वाजता मंत्रोपचारात संत भिकुजी महाराज यांना स्रान घालण्यात आले़. त्यानंतर महापुजेला सुरूवात झाली़. दोन तास महापुजा करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी उसळली़

पंढरपूरच्या पालखीला मिळाला बहुमान

संत भिकराम महाराज यांची माता अन्नपूर्णा यांचे वर्धा नदी काठावर मंदीर आहे़ या मंदीरात पुजा करण्याचा बहुमान पंढरपूर येथून आलेल्या विठ्ठल रुक्मिणी पालखीला मिळाला. दुसरा बहुमान चंद्रपूर येथील महाकाली पालखीला मिळाला.. तिसरा बहुमान जानकापूर येथील जानकी माता भजन मंडळ यांना तर चौथा आष्टा येथील भिकाजी महाराज भजन मंडळ यांना बहुमान मिळाला.. यावेळी शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला..नागपूर चिंचभवन नवदुर्गा महिला वारकरी भजन मंडळ, वर्धा जिल्ह्यातील सालई येथील विठ्ठल रुखमाई भजन मंडळ सोरटा येथील शारदामाता महिला मंडळ अव्वल ठरले राज्यातील सोलापूर, नाशीक, मराठवाडा तर विदर्भातील नागपूर, चांदनीबर्डी , वर्धा,अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, अकोला, बुलढाना या जिल्ह्यातून २१२ पालख्या आज सहभागी झाल्या होत्या़. विदर्भातील नामवंत बॅन्ड पथकांनी भिकुजी महाराजांचा संगीतावर जयजयकार केला.

चार धामातील संतांची हजेरी

आज संत भिकुजी महाराज यांच्या जन्मसोहळ्याला चारधामातील संतांनी उपस्थिती लावली होती़ त्र्यंबकेश्वर दीनदयाल पांडे महाराज बनारस येथील अक्षय आनंदजी बाल पांडे महाराज, काशीचे बम लहरी महाराज मथुराचे तुळशीदास महाराज काळमेघ ,उज्जैन चे कालभैरव महाराज यासह, हरीयाणा, पंजाब, व अनेक राज्यातील संत या सोहळ्याला उपस्थित होते़..

चार एकरात दोनशे क्विंटलचा महाप्रसाद

संत भिकुजी महाराज यांचे दर्शन घेतल्यानंंतर महाप्रसादासाठी भाविकांची एकच रिघ लागली
चार एकरात दोनशे क्विंटलचा
मसाला भात व बुंदी असा महाप्रसाद होता दुपारी अकरा वाजता पासून सुरू असलेला महाप्रसाद रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होता़ .संत भीकुजी जन्मोसव पूजन अध्यक्ष हंसराज जाधव सचिव उमेश चरपे , विश्वस्त मंडळाच्या हस्ते करण्यात आले. या जन्मोत्सव सोहळ्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख सह चरणसिंग ठाकूर, आमदार दादाराव केचे, आमदार प्रताप अडसड,माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी जि प अध्यक्ष विजय भैसे राजेंद्र अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद तलवारे यांची उपस्थिती होती.
भाविकांची दरवर्षी वाढती गर्दी पाहून पोलीस उपविभागीय अधिकारी सचींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळ दस्तगीरचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी आज चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़. एक किलोमीटर दुचाकी व चारचाकी वाहनाला बंदी घातली होती़. अनेक सामाजीक संस्थेच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती़.

veer nayak

Google Ad