डॉ. कालिंदी राणेच्या रुपातील नगराध्यक्ष पदाकरिता एक आर्वीकरांना नवीन चेहरा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : डॉक्टर कालिंदी राणे या आर्वीच्या प्रसिध्द स्री रोग तज्ञ असून. या सध्या लायन क्लब आर्वी च्या अध्यक्ष आहेत व त्या नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात.
मागील २५ वर्षाच्या सामाजिक व वैद्यकीय सेवेचा त्यांना अनुभव आहे ..त्या मृद भाषी व स्वभावाने स्वजवळ असून डॉ राणे मॅडम यांनी आरोग्य क्षेत्रात विशेष मोलाचे कार्य केले आहे. तसेच संपूर्ण विदर्भात युवकांना व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी विविध महाविद्यालयात जावून युवतींना व युवकांना व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरना साठी मोठे योगदान दिले आहे …
डॉ कालिंदी राणे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी …डॉक्टर राणे मँडम यांच्या सासूबाई कविता ताई राणे ह्या आर्वी नगर परिषद मध्ये महिला सदस्य राहिल्या आहेत व डॉ राणे यांच्या सासूबाई नगर परिषद आर्वी च्या उपाध्यक्ष सुद्धा राहिल्या आहेत हे विशेष ,तसेच डॉ राणे मॅडम यांचे भासरे तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राणे हे सुद्धा दोन टर्म नगर परिषद सदस्य राहिले आहेत व मागील काळात ते नगरपालिकेचे सक्रिय नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होते , त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने डॉक्टर कालिंदी ताई राणे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्यांनी राजकीय क्षेत्रात महिला पुढे आल्यास नगरपालिकेचा सर्वकष विकास होईल, असे सांगितले. तसेच मी उच्चविद्याविभूषित असल्याने व मी संपूर्ण आर्वीकर जनतेच्या अनेक वर्षापासून संपर्कात असल्याने आणि संपूर्ण आर्वीकरांच्या समस्याची मला मला जान असल्याने मी या पदा सोबत योग्य तो न्याय करू शकेल व सर्व आर्वी कर जनतेची सेवा करू शकेल असे प्रतिपादन डॉ राणे यांनी केले
आर्वी हे सुंदर व स्वच्छ शहर बनावे व संपूर्ण विदर्भात आर्वी हे विकासाचे हब म्हणून ओळखले जावे ही माझी इच्छा आहे जर मला नगर पालिका आर्वी ची नगर अध्यक्ष पदाची संधी मिळाली तर मी या साठी इमानेइतबारे प्रयत्न करेन असे सुद्धा डॉ कालिंदी ताई राणे यांनी सांगितले,त्यामुळे डॉक्टर कलिंदी ताई राणे कोणत्या पक्षा कडून नगराध्यक्ष पदासाठी निवडनुक लढतील याचे संपूर्ण आर्वीकर जनतेद्वारे तर्कवितर्क लावण्यात येत आहे , असा तगडा उमेदवार आपल्या पक्ष्या कडून लढावा म्हणून अनेक पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.
















