आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दिनांक .14. 10. 2025 ला आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाली .सभा वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ चांदुरकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मंचावर आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस प्रभारी श्री.अनिलजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा शिदोरी मासिकाचे प्रबंध संपादक श्री. अनंतदादा मोहोड, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री .चंद्रशेखर जोरे आर्वी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष चंद्रशेखर वनस्कर, आर्वी शहर अध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर भुयार, श्री. शैलेशजी अग्रवाल, काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व आर्वी तालुक्यातून काँग्रेसचे आलेले निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आर्वी विधानसभेचे प्रभारी श्री .अनिलजी गायकवाड यांनी पक्ष मजबूत करण्याकरता व संघटन वाढवण्याकरीता एकीने काम करावे. आपसातील भेदभाव विसरून जावे अशा सूचना केल्या. काँग्रेसचे महासचिव श्री अनंत दादा मोहोड यांनी प्रचंड संख्येने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले .व पक्षाचे कार्य एक जुटीने करावे त्याकरता माझे जे काही सहकार्य लागेल त्यासाठी मी तत्पर आहे असे सांगितले. जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ चांदुरकर यांनी नवीन नवनियुक्त अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. व होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता सर्वांनी सज्ज राहुन

काँग्रेसचे बळ वाढविण्यास सहकार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोरे यांनी करून संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली व प्रत्येक गावातील बुथ कमिट्या बीए.एल.ए नियुक्ती, पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी फॉर्म भरणे बाबत सूचना केल्या. या आढावा बैठकीच्या कार्यक्रमाचे संचालन आर्वी शहराध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर भुयार यांनी केले तर आभार प्रफुल्ल गळहाट याने मानले. कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्त्यांना नाष्टा व चहा देण्यात आला. कार्यक्रमा अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव श्री. अनंत दादा मोहोड यांनी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसला नवीन नेतृत्व भेटल्यामुळे आपले मनोगत व प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसमध्ये उत्साह संचारला अशी भावना व्यक्त केली. तसेच अनंत भाऊ यांनी नव्या जोमाने व ताकतीने आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढण्याचा निर्धार व्यक्त केला.















