आर्वी-तळेगाव रोड हा DPR प्रमाणे व्हावा याकरिता आर्वीकरांची मागणी!

0
221
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी-तळेगाव रोडच्या व्दिभाजकाचा तिडा सुटेना !

रोडवरच्या मधात असलेल्या झाडाबद्दल जन आक्रोश समितीची हायकोर्टात धाव

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : मॉडेल हायस्कूल पासून ते जुन्या पोलीस स्टेशन पर्यंत डिव्हायडर हा डी पी आर प्रमाणे दीड मीटरचा म्हणजे पावणे पाच फुटाच करण्यात आल. परंतु नगरपरिषद पासून वर्धा रोड टी पॉईंट पर्यंत विभाजक हे दोनच फुटाचे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला असल्याने विधानपरिषद आमदार दादारावजी केचे यांनी लगेच तेथे जाऊन दोन फुटाच्या डिव्हायडरला विरोध दर्शविला व डी पी आर प्रमाणे दीड मीटरचा डिव्हायडर घ्या व काम सुरू करा असे सांगितले.
तरीसुद्धा काम सुरू होत नसल्याने जनसामान्यात आक्रोश निर्माण झालेला आहे आता संघर्ष समिती कुठे आहे असा देखील अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देशमुख हे जनतेची दिशाभूल करून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर वायरल करत म्हणाले काही रोडच्या टेक्निकल बाबी समोर येत असल्याने हा डिव्हायडर दोनच फुटाचा करण्यात येत आहे असे सांगितले. टेक्निकल बाबी समोर येत आहे की कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? असा देखील आर्वीकर जनतेत चांगलाच चर्चेचा विषय रंगलेला आहे.


दि.१४ जून ला विश्रामगृह येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संघर्ष समितीवर अविश्वास टाकून पुन्हा एक जन आक्रोश समिती गठीत करण्यात आली परंतु त्या समितीला कोणताही अध्यक्ष नसून ती समन्वय समिती म्हणूनच गठीत राहील असे सर्वांच्या मते ठरवण्यात आले. व ती समिती कामाला लागली त्याच अनुषंगाने जन आक्रोश समितीने आता पर्यंत उचललेले पाऊल व चर्चा इतर जागृत नागरिकांचे विचार घेण्याकरिता दि.२४ जून ला विश्रामगृह येथे पुन्हा सर्वांचे साक्षीने मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये आतापर्यंत झालेली सर्व हकीकत जन आक्रोश समितीने मांडली या रोड संदर्भात आमदार सुमित भाऊ वानखडे आमदार दादारावजी केचे खासदार अमर भाऊ काळे यांना निवेदन देऊन नॅशनल हायवे रस्त्यासंबंधी सर्व अधिकाऱ्यांना डी पी आर प्रमाणे डीवाईडर व रस्त्याचे काम लवकर सुरू करायला लावा असे सांगितले. परंतु आठ दिवस लोटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. असे जन आक्रोश समितीने सांगितले मात्र रोडचे काम सुरू न झाल्यामुळे नागरिकांमधे चांगलाच आक्रोश दिसुन आला अखेर पाणी मुरतंय कुठे कुणी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? किंवा कोणी कुणाचा पावर दाखवून काम तर थांबवत नाही ना? असा देखील नागरिकांमध्ये चर्चेतून प्रश्न निर्माण झाल्याचे दिसले. यावेळी या मिटींगला जन आक्रोश समितीचे समन्वय सदस्य दशरथ जाधव, पंकज गोडबोले, मनीष उभाड, विजय वाघमारे, राजपाल भगत, गौतम कुंभारे, विनायक डोळे, मिथुन कोरडे तसेच पत्रकार बंधू व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान, अनिल लालवानी, डॉ. श्याम सुंदर भुतडा, उमेश भुसारी, सतीश शिरभाते, नितीन खुणे, उमंग शुक्ला, गोपाल छांगाणी, सुरेश काेडवाणी, हर्षल शेंडे, गौरव कुरेकर, विजय अजमीरे, सर्वेश भार्गव, मनीष काळे, धनंजय घटनासे, रवी मंछानी, राठीजी, नरेश गेडाम, संदीप सरोदे, राजू डोंगरे व इतर सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व आर्वीकर जागरूक नागरिक या मिटींगला हे प्रामुख्याने उपस्थित होते.

आर्वी शहरातून जात असलेल्या रस्त्याचे असे आहे नियोजन

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे व सर्वप्रथम ठरलेल्या डी पी आर प्रमाणे आर्वी शहरातून जाणार रस्ता हा २१.०५ मीटरचा चार पदरी रस्ता निर्माण व्हायला पाहिजे त्याप्रमाणेच रस्त्याचे एस्टिमेट झाले असून कंत्राट सुद्धा झालेला आहे या निकषाप्रमाणे मधातून दीड मीटरचा विभाजक आहे १४ मीटर रस्त्याचे सेमीटीकरण २ मीटरचे पेविंग ब्लॉक व १ मीटरची नाली असं नियोजन आहे.

प्रतिक्रिया

डिव्हायडर हे दीड मीटरचेच झाले पाहिजे व नॅशनल हायवेच्या डी पी आर नुसार जेवढा रोड मोठा होईल तेवढी वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही. व मोठे डिव्हायडर राहले तर अपघाताचे प्रमाणही टाळता येईल व रोडच्या मधात येत असलेले काही जीर्ण झालेल्या झाडापासून नागरिकांची जीवित हानी व आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता निकामी झालेले झाडे नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आपला अधिकार वापरून हे झाड काढण्यात यावे व रोडच्या मदात येत असलेले इतरही झाड हायकोर्टाचा निकाल लागल्यावर उर्वरित झाड काढून त्या झाडाच्या बदली दुसरे झाड लावण्याची पर्याय व्यवस्था करावी व प्रशासन नियमाने कोणतीही कारवाई करत असतांना राजकीय लोकांनी हस्तक्षेप करू नये अशी माझी हात जोडून विनंती.

सुधीर जाचक
सामाजिक कार्यकर्ते आर्वी.

प्रतिक्रिया

आर्वी-तळेगाव रोड हा अनेकांना प्रवास करतांना अडचणीचा ठरत होता. आर्विच्या व.इतर ग्रामीण भागातील लोकांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी नॅशनल हायवे रस्त्याच्या डीपीआर नुसार आर्वी-तळेगाव रोडचे काम झाले पाहिजे, त्यासाठी हा डिव्हायडर डी पी आर नुसार एक मीटरचा व्हायला पाहिजे. कमीतकमी चार फूट असणे तरी गरजेचे आहेत. यामध्ये नियमानुसार. कामे झाली पाहिजे. राजकीय. हस्तक्षेप होता कामा नयेत. तसेच रहदारीला अडथळे आणणाऱ्या झाडांना उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन,कालबाह्य झालेली झाडे कापण्यासाठी लोकप्रतिनिधीनी याचिका दाखल करून आर्वीच्या हितासाठी सर्वानी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. व्हिडीओ च्या माध्यमातून कुणिही खालची पातळी न ओलांडता ,कोणावरही खालच्या भाषेत वैयक्तिक टिकाटिप्पणी करु नयेत. तसेच समितीच्या नावाने कुणिही राजकारण न करता, केवळ जनता-जनार्दनाच्या विकासासाठी कार्य. केले पाहिजे. शेवटी आर्वीकरांच्या सोयीसाठी सकारात्मक भूमिका प्रत्येकाने. घेणे गरजेचे आहेत. असे माझे प्राजंळ मत आहेत.

अविनाश ल.टाके
सामाजिक कार्यकर्ते आर्वी.

प्रतिक्रिया

नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. अपघातांची शक्यता कमी व्हावी यासाठी दुभाजक असणे आवश्यक आहे. मात्र, त्याची रूंदी इतकी असावी की वाहनचालकांचे दृष्टीक्षेप बिघडणार नाहीत आणि वाहतूक सुरळीत चालू राहील. रस्त्यालगत असलेली अनेक जुनी, झाडे तोडण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
जर दुभाजक दीड मीटरचा घेतला, तर रस्ता अरुंद होण्याची शक्यता आहे — यामुळे वाहतूक कोंडी, विशेषतः गर्दीच्या काळात, वाढू शकते. तसेच एक बाजूला झाड व दुसऱ्या बाजूस मोठे डिव्हायडर यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता देखील निर्माण होते. या सर्व बाबी लक्षात घेता, जनतेच्या सुरक्षेचा विचार करताना तर्कसंगत आणि व्यावहारिक निर्णय घेणे आवश्यक आहे. दुभाजक आवश्यक आहे, पण तो असा असावा की रस्त्याची रुंदी कमी न होता वाहतुकीला अडथळा होणार नाही, अपघात देखील टाळतील आणि झाडांची हानी टळेल. अर्धा मीटरचा डिव्हायडर ही एक वास्तववादी आणि समतोल उपाययोजना वाटते.
तो सुरक्षितता तर देतोच, पण रस्ता संकुचितही करत नाही आणि पर्यावरणाचंही रक्षण करत राहतो.

डॉ.अभिलाष धरमठोक 

(जनरल फिजिशियन)

veer nayak

Google Ad