अमरावती, दि. 04 (जिमाका) : 36-धामणगाव रेल्वे आणि 37 बडनेरा विधानसभा निवडणुकीसाठी बी. के. वासवा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित तक्रारींसाठी त्यांच्याशी संपर्क करता येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 36 – धामणगाव रेल्वे आणि 37 – बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी बी. के. वासवा यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9021788055 असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना भेटण्याची वेळ सकाळी 10 ते 11 असून त्यांना सापन कक्ष, शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे भेटाता येणार आहे.
00000
मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी बिहान चंद्र चौधरी निवडणूक निरीक्षक
अमरावती, दि. 04 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024ची घोषणा भारत निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली आहे. 43 – मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून बिहान चंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
43 – मोर्शी विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण मिळून एकूण 311 मतदानकेंद्रांवर दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक निरीक्षक दि. 10 आणि 11 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमतदानाच्या कामाचे निरीक्षण करतील. दि. 12 आणि 13 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पथकांचे प्रशिक्षणावेळी, तसेच दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान यंत्रे निवडणूकीसाठी तयार करतेवेळी आणि दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना करतेवेळी मोर्शी येथे उपस्थित राहतील. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी ते मतदारसंघातील मतदान केंद्रांची पाहणी करणार आहेत. दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीदरम्यान उपस्थित राहून मतमोजणीचे निरीक्षण करणार आहेत.
निवडणूक निरीक्षक हे मतदार संघातील नागरिकांच्या निवडणूकविषयक तक्रारी अथवा सूचना स्विकारण्यासाठी शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे सकाळी 10 ते 11 वाजता या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9021796356 असा आहे. नागरीक निवडणूकविषयक तक्रारी किंवा सूचना त्यांच्या [email protected] या ई-मेल आयडी वरसुद्धा पाठवू शकतील, असे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार यांनी कळविले आहे.
Home आपला विदर्भ अमरावती धामणगाव रेल्वे, बडनेरा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन