शेतकरी विरोधी धोरण विरोधात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने बाळा जगताप यांचे अनोखे आंदोलन

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

बाळा जगताप यांचे उपविभागीय कार्यालयासमोर तूर, सोयाबीन, कापूस, फेकून केले आंदोलन

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी :- आज दिनांक १७ मार्च रोजी शेतकरी बाळा जगताप यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी समोर शेतीमाल (तूर,सोयाबीन,कापूस) फेकून प्रतिकात्मक अभिनव आंदोलन करीत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व्यथा निवेदनामार्फत कळवली. थंडी, ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता शेतकरी आपल्या शेतात राब राब राबतो.

मात्र शेवटी पिक हातात आल्यावर आम्हा शेतकऱ्यांच्या हातात काय येत तर नुकसान. गेल्या आठ ते नऊ वर्षापासून शेतीमालाचे भाव मुख्यत्वे तूर, सोयाबीन, कापूस यांचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या उलट कीटकनाशके , खते यांचे भाव मात्र अस्मानाला टेकत आहे. लावलेली लागत सुद्धा निघणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या पोरांची शेतीबद्दल आस्था संपत आहे. असेच जर चालू राहिले तर शेतकरी ही जात नष्ट होण्याचा मार्गावर आहे. प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. देव करो शाळेत विद्यार्थ्यांना एक होता शेतकरी ही शिकवण्याची वेळ येऊ नये. असे बाळा जगताप यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यावर अस्मानी, सुलतानी संकट चालूच असतात त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांना मारक आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मी बाळा जगताप प्रतिकात्मक आंदोलन करीत आहे. ईश्वर आपल्या शेतकऱ्यांचं भल करण्याची सद्बुद्धी देवो असे बाळा जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

veer nayak

Google Ad