धामणगाव रेल्वे :- येथील अन्नपूर्णा फायनान्स कंपनीत कर्मचार्याकडूनच लाखो रुपयांची फसवणुक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्यावर वैयक्तिक वापरासाठी लॉकरमधून पैसे काढल्याचा आणि ग्राहकांच्या नावावर फसवणूक करून कर्ज मंजूर करून निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार अन्नपूर्णा फायनान्स कंपनीतील कर्मचारी रतन गणेश गावंडे (३६) रा. दाभाडा हा गेल्या सात वर्षांपासून अन्नपूर्णा फायनान्स कंपनीत काम करत होता. २२ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी रतन गावंडे याने कंपनीच्या लॉकरमधील ५ लाख २७ हजार ९३६ रुपये काढून खर्च केले. हा प्रकार लक्षात आला असता गुन्हा कबूलसुध्दा केला व २ लाख३० हजार २५ रुपये परत केले. एवढेच नव्हे तर चुकीची माहिती देऊन १ लाख ७२ हजार ९३६ रुपये कर्ज मंजूर करून खातेदारांकडून वसूल केले व ती रक्कम स्वतः वापरली, तसेच १३ हजार ३८० रुपये कार्यालयाचा खर्च असताना तोही स्वतःच वापरून कंपनीची फसवणूक केली.आरोपीने ₹६.७३ लाख आणि ८१८ रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तपासादरम्यान हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले. रवींद्र मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.दत्तापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनात दत्तापुर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Home आपला विदर्भ अमरावती अन्नपूर्णा फायनान्स कंपनीत ६.७३ लाखांचा घोटाळा. कर्मचाऱ्याकडून आर्थिक गैरव्यवहार. फसवणुकीचा गुन्हा दाखल














